निवृत्ती नियोजन

Share:

Listens: 406

My Money ध्यानी मनी - आर्थिक नियोजन : एका उज्वल उद्यासाठी

Education


प्रत्येकाच्या आर्थिक नियोजनाच्या प्रवासामध्ये निवृत्ती नियोजन हा एक महत्त्वाचा टप्पा असतो. उतारवयामध्ये योग्य तेवढा पैसा गाठीशी नसल्यामुळे आणि चरितार्थासाठी इतर साधने उपलब्ध नसल्यामुळे अनेक वरिष्ठ नागरिकांना हलाखीच्या प्रसंगाला सामोरे जावे लागते. निवृत्ती हा एक महत्वाचा टप्पा ठरतो. याचं कारण असतं ही साधारणपणे निवृत्तीनंतर कोणत्याही प्रकारचा पगार आपल्या हातात येत नाही. दैनंदिन जीवनातील खर्चासाठी पूर्णपणे हाती असलेल्या गुंतवणुकीवर अवलंबून राहावे लागते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण हयात असेपर्यंत ही गुंतवणूक आपल्याला पुरेशी पडेल का हा प्रश्न सतत भेडसावत असतो.